जाहिरात
राजकीय

गडचिरोली : महायुतीत भाजपला ४ सभापतीपद, व राष्ट्रवादी काँग्रेसला १

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२१ जानेवारी)

नगर परिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक बुधवार (दि.२१) ला नगरपरिषद सभागृहात पार पडली. यात भाजपच्या गटाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखित सर्व महत्वाच्या समित्या आपल्या ताब्यात घेतल्या. या निवडणूकीत सभापतींची पाच ही पदे बिनविरोध निवडून आली. यात महायुतीत भाजपला ४ सभापतीपद, व राष्ट्रवादी काँग्रेसला १ सभापती पद मिळाले.

गडचिरोली नगरपरिषदेत नगराध्यक्षासह २७ पैकी १५ नगरसेवक भाजपचे आहेत.व दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ५ नगरसेवक आहेत, प्रत्येक सभापतीपदासाठी एक अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी सूर्यकांत पिद्दूरकर यांनी अर्ज स्वीकारून उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर केली.

नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे यांना अर्थ सभापतीपद देण्यात आले. यात बांधकाम सभापतीपदी अनिल कुंघाडकर तर शिक्षण सभापतीपदी हर्षल गेडाम तर पाणीपुरवठा सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) लिलाधर भरडकर, तर आरोग्य सभापतीपदी मुक्तेश्वर काटवे,महिला व बालकल्याण सभापती पदी सीमा कोसे, महिला व बालकल्याण उपसभापती पदी शिल्पा गव्हारे यांची निवड करण्यात आली आहे.

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी,नगर परिषद च्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, लोकसभा समन्व्यक प्रमोद पिपरे यांनी नवनियुक्त सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.याच सभेत नगरपरिषदेच्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीचेही गठन करण्यात आले.

लोकहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास आमचे प्राधान्य राहिल, अशी ग्वाही नवनियुक्त सभापती यांनी लोकशाही न्युज ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. आज झालेल्या सभापती पदाच्या निवडीसाठी निवडून आलेल्या नवनियुक्त नगरसेवकांनी हजेरी लावली होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button