जाहिरात
भ्रष्टाचार

अखेर “तो” ग्रामसेवक दिलीप मेश्राम निलंबित

अडपल्ली ग्रामपंचायतीत केला प्रचंड गैरव्यवहार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १ जुन)

गडचिरोली तालुक्यातील अवघ्या ३ कि.मी अंतरावरील अडपल्ली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांनी केलेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी निलबित केले. निलंबित झालेले दिलीप मेश्राम हे तो मी नव्हेच म्हणून डोक्यावर भगवी टोपी व कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावून स्वतःला गुरुदेव भक्त व ह.भ.प. महाराज म्हणून गावांमध्ये मिरवायचे.

अडपल्ली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक दिलीप मेश्राम हे गेल्या ७ वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत होते. त्यांनी २०२१ मधे निकृष्ट दर्जाची कामे करणे. विना टि.पी. ची अवैध रेती उचल करणे, ई. टेंडर न करताच साहित्याची खरेदी करणे, अंदाजपत्रका शिवाय कामे करणे, ऑनलाईन आराखडयात मंजुर रकमेपेक्षा जास्त खर्च करणे ‘ कोटेशन ग्रामपंचायत च्या सभेत मंजुर न करणे, बांधकाम कामाकरीता मंजुरी न घेणे, घरटॅक्स वसुली केलेली रक्कम बॅकेत जमा न करता अफरातफर करणे . खरेदी रकमेच्या बिलातून २ टक्के जीएसटी न भरणे, स्वतःच्या मुलाच्या नावाने ई. टेंटर भरणे अश्या गैरकारभाराच्या अनेक बाबी चौकशीत लक्षात आल्यामुळे प .स च्या गटविकास अधिकारी यांनी सदर प्रकरण सि. ई ओ गडचिरोली यांना माहीती सादर करतांच ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांना निलंबित करण्यात आले.

सदर गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार सन २०२१ मधेच करण्यात आली होती. परंतु ग्रामसेवक मेश्राम हे ग्रामपंचायत सोडुन दररोज बिडिओ गडचिरोली यांचेकडे चकरा मारत होते टिळा लावून हभप चे मार्गदर्शन अधिकाऱ्यांना सांगुन गोड गोड बोलून भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांना भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित व्हावे लागले. मेश्राम यांची चौकशी करण्याकरीता बिडिओ ने तब्बल एक वर्ष लावले याचेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button