गडचिरोली : १६ जानेवारी पासुन होणारी जीडीपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयावर शेकडो तरुणांचा मोर्चा
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २ जानेवारी)
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा प्रेक्षागार मैदानावर (धानोरा रोड) येथे अनेक तरुण तरुणी पोलीस भरतीची तयारी करत असतात. त्यांच्या प्रशिक्षणाला कुठलाही धक्का लागू नये म्हणुन तरुणांच्या करिअरच्या आकांक्षांना सर्वोच्च प्राधान्य देत, ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ (LMEL) या वर्षासाठी ‘गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग’ (GDPL) अधिकृतपणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
(पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींचा शेकडो च्या संख्येने मोर्चा)
आज (दि. २ जानेवारी) सकाळी जिल्हा प्रेक्षागार मैदानावरील सराव करणारे अनेक तरुण व तरुणीनी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या चामोर्शी रोड स्थित कर्तव्य कक्ष कार्यालयावर सकाळी ९ वाजता हल्लाबोल मोर्चा केला. तरुणांनी कार्यालयावर हल्लाबोल केल्याचे पाहताच डॉ. मिलिंद नरोटे यांना लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यालयात बोलावून चर्चा करून जीडीपीएल क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्याची घोषणा केली.
बी. प्रभाकरन
व्यवस्थापकीय संचालक
लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड
!!!
हा निर्णय जड अंतःकरणाने परंतु स्पष्ट उद्दिष्टे समोर ठेवून घेतला आहे.बी प्रभाकरन पुढे म्हणाले, “गडचिरोलीच्या दारात राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा अनुभव आणण्या साठी GDPL लायक मोठे व्यासपीठ बनवण्याचे आमचे स्वप्न होते. मात्र आमच्या स्थानिक तरुणांची स्वप्ने आणि त्यांचे करिअर आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. पोलीस भरतीसाठी हे तरुण याच मैदानावर किती मेहनत घेत आहेत, याची आम्हाला जाणीव आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत होणार होता उदघाट्न सोहळा
!!
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव आणि जगातील सुप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या उपस्थितीत उदघाट्न सोहळा स्थगित झाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांना फार दुःख झाले आहे.
