व्यथा
वन्य प्राण्यांनी केले शेतातील पिक भुईसपाट, नुकसान भरपाईची मागणी
लोकशाही न्युज गडचिरोली (दि,२८ डिसेंम्बर)
गडचिरोली मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरमाळी येथील शेतकरी अनुरथ विश्वनाथ निलेकार शेत सर्वे नं. १०७ (आराजी १.३० हे.आर.) मौजा रोठा रिट पटवारी साजा क्र. १५ दुधमाळा हे असून यामध्ये लागवड केलेले तुर, हरभरा, जवस आणि बोरु पीक वन्यप्राण्यांनी संपूर्ण शेताची पुर्णतः १००% खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांची ७० ते ८० हजार रुपयाची आर्थिक नुकसान झाली आहे.
तरी शेतावरील शेतमालाची मोका चौकशी करुन झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी अनुरथ निलेकार यांनी
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चातगाव येथे निवेदनातून केली आहे .

