आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा
महिला जागृती व कर्तबगार महिलांचा भव्य प्रवेश सोहळा संपन्न

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ११ डिसेंबर)
गडचिरोली येथील नवेगाव कॉम्प्लेक्स येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका समोरील मैदानावर राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन निमित्ताने महिला जागृती कार्यक्रम व कर्तबगार महिलांचा संघटनेत भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव उसेंडी माजी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र,उदघाटक प्रशांत वाघरे माजी जिल्हाध्यक्ष भाजपा, प्रकाश गेडाम जिल्हा महामंत्री भाजपा,सह.उदघाटक चंदा कोडवते, भारत खटी प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,प्रमुख पाहुणे डॉ. प्रणय खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,राज्य उपाध्यक्ष राहुल झोडे,सामाजिक कार्यकर्ते विकास वडेट्टीवार,धम्म दीप बोदेले,संजय बारापात्रे,अखिल तायडे,रमेश अधिकारी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी,कार्याध्यक्ष मंजुषा आत्राम,उपाध्यक्ष नानु उपाध्ये,किशोर कुंडू, दीपक सातपुते,तालुका सचिव दिनेश मुजुमदार, संतोष बुरांडे,लक्ष्मी कन्नाके, सचिव तेजस्विनी भज्जे,कोषाध्यक्ष जाहेदा शेख, प्रसिद्धी प्रमुख पल्लवी आत्राम,गडचिरोली तालुका शहराध्यक्ष स्नेहल मेश्राम,भूषणा खेडेकर शहर उपाध्यक्ष, शहर सचिव राणी गोपशेट्टीवार, शहर प्रवक्ता शीतल मेश्राम उपस्थित होते.
उपस्थितांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नामदेव उसेंडी, उद्घाटक प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, सह उदघाटक चंदा कोडवते, भारत खटी, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे सामाजिक कार्यकर्ते धम्मदीप बोदेले व संघटना पदाधिकारी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले.
गडचिरोली शहरातील महिला सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत कार्य करण्याची इच्छा आहे अशा शेकडो महिला कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांमध्ये स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत प्रवेश केला. व उपस्थित मान्यवर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने संघटनेचा सन्मान दुपट्टा देऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत प्रवेश दिला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवेगाव कॉम्प्लेक्स येथील स्थानिक महिला पदाधिकारी कार्यकर्ते व वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका येथील विद्यार्थी,विद्यार्थिनी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केला.
