जाहिरात
गडचिरोली

गडचिरोली: १२ लाख रुपये किमतीची दारू व २ चारचाकी जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ नोव्हेंबर)

गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेची चमू आगामी निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली परिसरात गस्त करीत असतांना दि, १२ नोव्हेंबर रोजी गोपनिय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोली शहरातील गोकुळनगर परिसरातील अवैद्य दारु विक्रेता आकाश भरडकर हा त्याचा साथीदार रोशन लोखंडे याच्या मदतीने मौजा ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर येथून गडचिरोली परिसरात अवैद्य देशी व विदेशी दारुची वाहतुक करून आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मनोज मुजुमदार व क्रिष्णा मुजुमदार यांना पुरवठा करणार होते.

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने पोरेड्डीवार इंजिनिअरींग कॉलेज, बोदली परिसरात सापळा रचून असतांना दोन वाहने समोरून येतांना दिसताच त्यांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता, त्यात रॉकेट देशी दारुचे १३० बॉक्स सापळले. दारुचे बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण १२ लक्ष रुपये चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून वाहनातील आरोपी आकाश भाऊराव भरडकर रा. गोकुळनगर, रोशन हरिदास लोखंडे रा. उंदरी, ता. उमरेड, जि. नागपूर यांना अटक करून त्यांचे व पाहिजे असलेले आरोपी मनोज मुजुमदार, रा. एटापल्ली व क्रिष्णा मुजुमदार रा. कसनसुर यांचे विरुद्ध पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या देखरेखी खाली करण्यात आली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button