जाहिरात
ब्रेकिंग न्युज

खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला अपघात,खासदार सुरक्षित

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,४ नोव्हेंबर)
संपादक:संदिप कांबळे

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते आज सकाळी नागपूर वरून गडचिरोली ला येत असतांना वाहनाला अपघात झाला त्यात ते पूर्णतः सुरक्षित असून कुठलीही जीवित हानी झाली नाही.

काल रात्री मुंबई येथे युती पक्षाच्या खासदार व आमदारांची बैठक पार पाडून आज सकाळी ते विमानाने मुंबई वरून नागपूर येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आलेत व नागपूर वरून आपल्या खाजगी फोर्ड कंपनी च्या वाहन क्रमांक MH- 33 AA – 9990 या वाहनाने गडचिरोली प्रवासा दरम्यान सकाळी १०:१५ वाजता नागपूर-उमरेड या महामार्गावर एका ट्रक ला विहिरगाव रस्त्याच्या ठिकाणी धडक दिली.

त्यात खासदार नेते यांच्या वाहनाला अपघात झाला.सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झाला नाही.खासदार व चालक व सेक्युरिटी चे सर्व सदस्य हे सुरक्षित आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button