गडचिरोली (दि,१ ऑगस्ट)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा शाखा गडचिरोली चे जिल्हा प्रधान सचिव श्री विलास पारखी यांचा वाढदिवस विहीरगाव फाट्याजवळील जंगलात आंबा, जांभूळ, चिकू सारख्या फळरोप वृक्षांची लागवड करून साजरा करण्यात आला. प्रा विलास पारखी हे पर्यावरण प्रेमी आहेत ते दरवर्षी आपला जन्म दिवस केवळ वृक्षारोपण करून थांबत नाहीत तर उन्हाळ्यात त्यांना पाणी घालून जगवण्याचे कामही करीत असतात. मागील वर्षी वृक्षारोपण केलेल्या रोपांना उन्हाळ्यात पाणी घालण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तीने जंगलास आग लावल्याने सर्व रोपे आगीत जळून नष्ट झाले. तेव्हा या वर्षी लावलेल्या वृक्षांना जगविण्यासाठी खबरदारी घेतली जाईल असे मित्र परिवारांना सांगितले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प चेराज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर, सदस्य श्री किशोर पाचभाई, श्री आखाडे ग्रामसेवक श्री इंद्रजित कुमार उपस्थित होते.
