गडचिरोली : भाजपा महायुतीत राहूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जाणार
पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेतून माहिती

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १६ ऑक्टोबर)
येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही महायुतीच्या माध्यमातून एकदिलाने आणि संपूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती आज दि.१५ ऑक्टोबर रोजी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
येणारी स्थानिक निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून एकदिलाने आणि संपूर्ण ताकदीने लढवणार आहोत. गडचिरोलीच्या जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी आहे.आम्ही महायुतीमध्येच निवडणूक लढणार.विरोधकांनी पसरवलेल्या कोणत्याही निराधार अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. महायुतीचे पुढील धोरण निश्चित करण्यासाठी सर्व प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसोबत लवकरच निर्णायक बैठक घेण्यात येईल. अशीही माहिती दिली.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार देवराव होळी, माजी आमदार नामदेव उसेंडी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री अनिल तिडके, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, युवा मोर्चा अध्यक्ष मधुकर भांडेकर, रवि ओल्लालवार, जिल्हा महिला अध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा महिला महामंत्री गीता हिंगे हजर होते.
