जाहिरात
आपला जिल्हा

निराधारांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य च्या मागणीसाठी डाव्या पक्षांचे जिल्हाभरात १ दिवसीय ठिय्या आंदोलन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१७ ऑक्टोबर )

संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य करावे यासाठी शेतकरी कामगार पक्षासह डाव्या मित्रपक्षांनी वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर राज्य शासनाने या योजनेतील अपंग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य सुरू केले आहे. मात्र इतर लाभार्थ्यांना ही वाढ लागू करण्यात आली नसल्याने सध्याच्या महागाईच्या काळात विधवा परित्यक्ता व वयोवृध्द निराधारांनी अल्प अर्थसहाय्यात आपली गुजराण कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना सरसकटपणे किमान अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य तातडीने लागू करावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील विविध तहसील कार्यालयांसमोर शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या डाव्या मित्रपक्षांनी शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हाभरातील विविध तहसील कार्यालयांसमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन व धरणे प्रदर्शने केले.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, डॉ. गुरुदास सेमस्कर, चंद्रकांत भोयर, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अभिलाषा मंडोगडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली तहसील कार्यालयासमोर निराधार योजनेचे लाभार्थी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी रामदास दाणे, किसन साखरे, महागू पिपरे, गजानन झाडे, एकनाथ मेश्राम तरकडू भोयर, मारोती मडावी, माणिकराव शिडाम, देवाजी गेडाम, भाऊजी गुरुनूले, महादेव नैताम, सोमाजी राऊत यांच्या सह शेकडो निराधार लाभार्थ्यी उपस्थित होते.

धानाला शासनाने साडेतीन हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीचाही समावेश असलेल्या या आंदोलनाचे आरमोरी येथील तहसिल कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, विठ्ठल प्रधान, राजू सातपुते, अशोक शामकुळे, रमेश मेश्राम, प्रमोद कोजेकर, अर्चना मारकवार, रंजना कुंभलकर यांनी केले. यावेळी आंदोलन स्थळी येवून नायब तहसीलदार दोनाडकर यांनी निवेदन स्वीकारले.

एटापल्लीत जयश्री जराते च्या नेतृत्वात ठिया  आंदोलन  !!!

शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री जराते, युवक नेते भाई अक्षय कोसनकर, आकाश आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो निराधार लाभार्थ्यींनी एट्टापल्ली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात केले व तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात लुला गावडे, झुरु आत्राम, सुनिता लेनगुरे, अम्माबाई गावळे, सुंदरा निकुरे, काशीबाई सडमेक, ईश्वर गावळे, मैना बावणे, उज्वला पुंगाटी, चैतेबाई तलांडे, निलाबाई निकोडे, मंगरु मडावी यांच्यासह शेकडो निराधार सहभागी झाले होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button