गडचिरोली : प्राईम हॉस्पिटल येथे प्रथमच हिप रिप्लेसमेंट सर्जरी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ६ ऑक्टोबर)
गडचिरोली शहरातील मध्यभागी चंद्रपूर रोड वर असलेल्या प्राईम हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदाच टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात आली.
हिप रिप्लेसमेंट सर्जरी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. ज्यामध्ये नैसर्गिक हिप जॉईंटचे रोगग्रस्त भाग काढून त्या ऐवजी कृत्रिम हिप जॉईंट बसविले जाते. याला हिप आर्थ्रोप्लास्टी देखील म्हणतात. आणि याचा उद्देश वेदना कमी करणे, हिपच्या कार्यामध्ये सुधारणा करणे आणि एकूण जीवनाची गुणवत्ता वाढविणे हा आहे. हि शस्त्रक्रिया साधारणपणे १ ते २ तास चालते आणि यानंतर पुनर्प्राप्तीसाठी १३ आठवडयापर्यतचा कालावधी लागू शकतो.
सदर शस्त्रक्रिया ही २८ सप्टेंबर रोजी डॉ. नन्नावरे, डॉ. जयश्री देवगडे तसेच अणेस्थिसिया डॉ मित्तल गेडाम यांनी पार पाडली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या २४ तासात पेशंट वाकर च्या मदतीने चालायला लागला.
