जाहिरात
आपला जिल्हा

संरक्षण भिंत बांधण्याच्या वादावरून अनुसूचित जातीच्या लांडगेवर गावकऱ्यांचा बहिष्कार कार्यकर्त्याला खूश करण्यासाठी आमदाराची खेळी,छगन शेडमाके यांची तक्रार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली/देसाईगंज (दि,२० जून)

देसाईगंज तालुक्यातील पोटगाव गट ग्रामपंचायती अंतग॔त येत असलेल्या विठ्ठलगाव येथील अनुसूचित जाती समाजाच्या घनश्याम विठ्ठल लांडगे यांच्या मालकी हक्काच्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्याच्या उफाळून आलेल्या वादामुळे गावऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान जागा मालकाने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष छगन शेडमाके यांनी मोका चौकशी केली असता कार्यकर्त्याला खूश करण्यासाठी आमदार कृष्णा गजबे यांची खेळी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने या गंभीर तेवढ्याच धक्कादायक प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेडमाके यांनी जिल्हाधिकारी संजय मिना यांच्याकडे केलेल्या तक्रारीतुन केली असल्याने एकच खळबळ माजली आहे.

आमदार कृष्णा गजबे यांचे मुळ गाव देसाईगंज तालुक्यातील पोटगाव असुन या गट ग्रामपंचायती अंतग॔त येत असलेल्या विठ्ठलगाव येथील घनश्याम लांडगे यांना प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी १२ मार्च २०१० रोजी वनहक्क पट्ट्याने भु.मा.क्र.१४४ आराजी-०.०४ हे.आर. जमिन दिली आहे.लांडगे यांचा वडीलोपार्जित कब्जा वहिवाट असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सदर जागेचा वनहक्क पट्टा मिळाला आहे.सदर जागेवर लांडगे हे कुटुंबासह राहात असुन त्यांचे घराचे बाजुला बौद्ध विहार ज्या बाजुने लांडगे यांची खुली जागा आहे.
बौद्ध विहाराच्या संरक्षण भिंत बांधकामा करीता शासकीय स्तरावरुन १० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.सदरचा निधी गट ग्रामपंचायत पोटगावच्या वतिने सदर बांधकामासाठी खर्च करावयाचे असुन सदर कामाचे कंञाट कोणतेही रजीस्ट्रेशन नसलेल्या माञ भाजपाचा कार्यकर्ता असलेल्या विहीरगाव येथील नितीन शंभरकर यांना देण्यात आले असल्याचे जागा मालक लांडगे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान गैरअर्जदार आमदार कृष्णा गजबे व गट ग्रामपंचायत पोटगाव यांची कोणतीही मालकी नसताना किंवा त्यांचे ताब्यात सदरची जागा नसताना लांडगे यांच्या मालकीच्या जागेत असलेले गोबरगॅसचे टाके तोडुन व अनाधिकृत अतिक्रमण करुन आमदार गजबे यांच्या सांगण्यावरून संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे जे की बेकायदेशीर आहे. यास जागा मालक लांडगे यांनी विरोध केला असता आमदार गजबे यांनी जागा मालकाला धमकावत बळजबरीने बांधकाम करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करत त्यांच्याच सांगण्यावरून गैरअर्जदारांनी व गावातील सर्व लोकांनी मिळुन सामाजिक बहिष्कार टाकला आहे.यामुळे लांडगे यांना जीवन जगने कठिण झाले आहे.

ही गंभीर बाब लक्षात घेता व आमदार हे जबाबदार व्यक्ती असुन शासनाच्या निधीचा कोठे व कसा वापर करायचा हे ज्ञात असतांना देखील आमदार गजबे यांनी पदाचा दुरुपयोग करून तसेच शासकीय निधीचा गैरवापर करून कार्यकर्त्याला खूश करण्यासाठी खेळी खेळली असल्याचा आरोप जागा मालकाने केला आहे.लांडगे हे अनुसूचित जातीचे असुन दारिद्र्य रेषेखालील इसम आहेत.अशा स्थितीत त्यांना एकटे पाडण्यात आल्याने त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेडमाके यांनी प्रत्यक्ष मोका चौकशी केली असता केलेल्या आरोपात तथ्य आढळून आल्याने या गंभीर तेवढ्याच धक्कादायक प्रकरणाची सखोल चौकशी करून लांडगे यांच्यावर बहिष्कार टाकण्यासाठी भाग पाडणाऱ्या व बळजबरीने बांधकाम करणारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेडमाके यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याने एकुणच प्रकरण चांगलेच शेकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button