जाहिरात
निधन वार्ता

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे खाजगी स्वीय सहायक तुषार सातपुते यांचे अपघाती निधन

लोकशाही न्युज कडुन भावपुर्ण श्रद्धांजली

Spread the love

लोकशाही न्युज,चामोर्शी (दि.३ सप्टेंबर)

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे राहणारा व लहानपणी पासूनच त्यांच्या परिवारासोबत राहणारा मृदु शांत व संयमी स्वभाचा असा विश्वासू साथीदार तुषार सातपुते रा. खंडाळा ता. चामोर्शी यांचा दोन दिवसापूर्वी चामोर्शी – मुल मार्गावरील हरणघाट पुलाजवळ अपघात झाला.

त्यांच्या डोक्याला व हातापायाला जबर दुखापत झाली असल्याने नागपुर येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान २ सप्टेंबर मंगळवारी रात्री दहा वाजता त्यांचे दुःखद निधन झाले.

दि. ३ सप्टेंबर बुधवारी दुपारी ४ वाजता मार्कंडा वैनगंगा नदी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मृत्यू पश्चात मागे आई, वडील, पत्नी व दोन मुले बराच मोठा आप्त परिवार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button