पेंढरी ,मोहगाव, येथील टीडीसी अंतर्गत असणाऱ्या धान खरेदी केंद्रांचे आमदार डॉ देवराव होळी यांचे हस्ते उद्घाटन
गडचिरोली (दि,१९ नोव्हेंबर)
आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या धान खरेदी केंद्रांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी धानोरा तालुक्यातील मौजा पेंढरी ,मोहगाव, येथील टीडीसी अंतर्गत असणाऱ्या धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन करतांना केले.

यावेळी टीडीसीचे एस आर एम श्री सोनवणेजी, पेंढरीचे सरपंच पवन येरमे सौ. ,श्री. श्रीनिवास दुलमवार माजी जी. प. सदस्य, ओबिसी जिल्हा महामंत्री भास्करजी बुरे लक्ष्मी आतला, श्री. देवसाय आतला अध्यक्ष, श्री. बाऊसु पावे, श्री अंतराम आतला, श्री. काशिनाथ आ, सोनवणे यांचे सह शेतकरी बांधव व आदिवासी महामंडळाचे पदाधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
धान खरेदी करतांना आदिवासी, गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेण्याचे निर्देश आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी या केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. तसेच या केंद्रांचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले .
