जि. प. शाळेतील “लैला मजनु” ला शिक्षणाधिकारी यांचे अभय
शाळा व्यवस्थापन समितीची मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि. २ जुले)
जानेवारी महिन्यात शाळेतच विध्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करणाऱ्या जयनगर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिका यांचे उघडकीस आलेल्या प्रकरणात शाळा व्यवस्थापन समिती जयनगर, पंचायत समिती चामोर्शी ने रीतसर पुराव्या सह लेखी तक्रार केल्या नंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली. मात्र चौकशी समितीने दोन्ही लैला मजनु मुख्याध्यापक – शिक्षिका यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याबाबत दिलेला अहवाल केराच्या टोपलीत टाकून त्यांच्या सोईनुसार नजीकच्या शाळेत बदली करून दोघांनाही पूर्णपणे अभय दिल्याने संपूर्ण जिल्हात जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उभे झाले आहे.
या प्रकरणात शिक्षणाधिकारी यांनी आर्थिक देवाण घेवाण केली असल्याची शंका समितीकडून व्यक्त केल्या जात आहे.अनेकदा निवेदने करून वेळ प्रसंगी शाळेला कुलूप लावण्याचे आंदोलन करून देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने दोन्ही लैला मजनु शिक्षकांची हिम्मत वाढली असून जिल्हात शिक्षण क्षेत्रात कुणाचाही वचप उरला नाही ही भावना वाढली आहे. असे असतांना या जोडीने गावात पैशाचा वापर करून ज्यांचे पाल्य शाळेत नाहीत अशा लोकांची खोटी सही करून शाळा व्यवस्थापन समितीनेच खोटी तक्रार केली असे पत्र बनवून शिक्षणाधिकारी यांना एक पत्र देऊन या जोडीला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. ही चोरी शाळा व्यवस्थापन समितीने पकडून खोटी सही मारून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या माजी अध्यक्षाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करून तसा पत्र मुख्य कार्यपालन अधिकारी गडचिरोली यांना देण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी शिक्षिका हिने नुकतेच आपल्या अविवाहीत शिक्षण घेणाऱ्या मुलीची खोटी लग्न पत्रिका बनवून भविष्य निर्वाह निधीतून मोठी रक्कम उचलून संपूर्ण जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून स्वतःच्याच कुटुंबाची बदनामी केल्याने तिची वेगळी चौकशी देखील सुरु असल्याचे समितीने सांगितले. असे असून देखील त्यांचेवर कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही शेवटी नाईलाजाने जयनगर येथील शाळा व्यवस्थापन समितीची व गावकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री गडचिरोली यांना न्याय मागण्यासाठी नागपूर येथे त्यांच्या सचिवालयात मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मित्रा यांची दि. १ जुलै रोजी भेट घेतली.आता तरी जयनगर वासीय विद्यार्थी व पालकांना योग्य न्याय मिळेल व शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षिकेला कठोर शिक्षा मिळेल व या लैला मजनु जोडीला अभय देणाऱ्या शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांचेवर देखील कार्यवायी करावी अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(जयनगर शाळा व्यवस्थापन समितीची मुख्यमंत्री सचिव कार्यालयात तक्रार दाखल)
शिष्टमंडळात शाळा व्यवस्थापन समिती व गावकाऱ्यांच्या वतीने अध्यक्ष शंकर साना व माजी पंचायत समिती सदस्य तथा सदस्य शाळा व्यवस्थापन समिती विष्णू ढाली यांचे नेतृत्वात जयदेव बार, संजय मंडल, सुशंकर रॉय, नरोत्तम मुजुमदार, सुजाता चौधरी, पौर्णिमा बिश्वास, सुनम मुजमदार, मीना मुजुमदार, श्रीती मंडल, अल्का बैरागी, प्रतिमा सरकार, नितीश मंडल मीनाक्षी हलदर उपस्थित होते.
