खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात २१ जून ला आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा स्टेडियम ग्राउंड वर साजरा
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२१ जून)
योग आहे आरोग्यासाठी क्रांती,नियमित योगामुळे जीवनात येथे सुख-शांती.आरोग्यम् धनसंपदा,
करो योग,रहो निरोग संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने, संपूर्ण देशात एकाच वेळी आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज ,गडचिरोली स्टेडियम ग्राउंडवर खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात योग दिन साजरा करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने शिबिराला जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,योग शिक्षक अनिल निकोडे,योग शिक्षक खुशाल म्हस्के,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटि,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत भुगुवार,अनिल कुनघाडकर, सचिनभाऊ तंंगडपल्लीवार,केशव निंबोड, राकेश शेरकी,राकेश राचमलवार, हर्षल गेडाम, तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने युवक वर्ग या योग शिबिराला उपस्थित होते.
या शिबिराच्या निमित्याने या शिबिराला अतिशय चांगला योग शिकवणारे योग शिक्षक अनिल निकोडे,खुशाल मस्के यांचे शाल श्रीफळ देऊन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
