डॉ. अविनाश टेकाडे (अधीष्ठाता) यांचेवर फौजदारी गुन्हा नोंद करा
उबाठा व आदिवासी टायगर सेनेची पत्रकार परिषदेतून मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १९ मे)
१० मे ला गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी वैनगंगा नदी घाटात बुडून मरण पावले या दुर्दैवी घटनेला सर्वस्वी जबाबदार अधीष्ठाता डॉ. अविनाश डेकाटे असुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करावा अशी मागणी आज (दि.१९) ला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उबाटा व आदिवासी टायगर सेनेने केलेली आहे. डॉ. अविनाश डेकाटे यांच्या बेजबाबदारपणामुळे व निष्काळजीपणामुळेच वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला त्याला सर्वस्वी जबाबदार डॉ. अविनाश डेकाटेच आहेत.ते वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्यांची काळजी घेत नाही.याची सखोल चौकशी करण्यात यावी अशीही मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.
गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन जवळजवळ सहा महिने पूर्ण झालेले आहेत वैद्यकीय महाविद्यालयात ४४८ जागा उपलब्ध असताना सुद्धा केवळ ६ ते ७ जागा भरलेल्या आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयात ४२ मुली व ५२ मुले शिक्षण घेत आहेत. तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात पदभरती घेण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ होऊ नये यासाठी प्रयत्न करावे अशी ही मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली.
आज झालेला पत्रकार परिषदेला उबाटा गटाचे पवन गेडाम युवा सेना जिल्हाधिकारी गडचिरोली, अमोल कुळमेथे जिल्हाध्यक्ष आदिवासी टायगर सेना, कुणाल कोवे जिल्हा आदिवासी विकास परिषद, अतुल नैताम, चेतन उरकुडे, रुपेश लहाने, वैभव सातपुते, गणेश धोटे, निलेश कोडापे हजर होते.
