जाहिरात
आपला जिल्हा

८ जुन ला तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संताजी सोशल मंडळाचा उपक्रम

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१९ मे)

संताजी सोशल मंडळ तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १० वी तील उत्तीर्ण विध्यार्थी व विद्यार्थिनी ८० टक्के च्या वर गुण असलेले व १२ वी तील उत्तीर्ण ७० टक्के च्या वर गुण असलेले यांचा सत्कार तसेच पीएचडी, एमपीएससी, यूपीएससी तसेच नवोदय, स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण तसेच ७५ वर्षांवरील तेली समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार दि. ८ जून २०२५ रोज रविवारला दुपारी १२ वाजता संताजी भवन सर्वोदय वार्ड गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे.

सर्व गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते शील्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार होणार आहे तसेच दारिद्र्यरेषेखाली दहावी व बारावी येथील तीन विद्यार्थ्यांना स्वर्गीय श्रावण तरारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रमोद तरारे मुंबई यांच्याकडून प्रत्येकी २१ हजार रुपये स्कॉलरशिप म्हणून देण्यात येणार आहे तरी गुणवंत तेली समाजातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत मोबाईल नंबर लिहून दि.३१ मे २०२५ पर्यंत संताजी मंडळाच्या पदाधिकाऱ्याकडे जमा करावी.

प्राध्यापक देवानंद कांमडी,विठ्ठल कोठारे, सुरेश भांडेकर, रामदासजी कुंनघाडकर, राजू ईटनकर, प्रमोद पिपरे,प्रभाकर वासेकर, गोपीनाथ चांदेकर,अनिल बालपांडे, विष्णू कांबळे, राजेंद्र भरडकर, सुधाकर लाकडे, सुरेश निंबोडकर यांच्याकडे जमा करावे असे आव्हान संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक देवानंद कामडी यांनी आवाहन केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button