जाहिरात
क्राईम

गडचिरोली : सेवानिवृत्त ६१ वर्षीय महिलेची हत्या

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १४ एप्रिल)

गडचिरोली शहराजवळ अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची हत्या झाल्या ची घटना उघडकीस आल्याने गडचिरोली शहरात खळबळ माजली आहे. मृतक महिलेचे नाव कल्पना केशव उंदिरवाडे (वय.६१) आहे.

मृतक महिला कल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या.

घरकाम करणाऱ्या महिलेने ही माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, चामोर्शी मार्गावरील एका पेट्रोल पंपवर काम करणारा कल्पना उंदिरवाडे यांचे जावईदेखील घटना स्थळावर पोहचले. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी रात्री ८ वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.

पुढील तपास पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे हे पथकासह घटनेचा तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे मृतक कल्पना उंदिरवाडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या बोटातील ३ अंगठ्या तशाच होत्या. शिवाय अंगावरील अन्य दागिनेही सुरक्षित होते. त्यामुळे त्यांची हत्या चोरीच्या हेतूने झाली नसावी, हे स्पष्ट होते. त्यामुळे हत्या करणारा नेमका कोण? तो जवळचा व्यक्ती असावा? असाही संशय व्यक्त केला जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button