वर्षभरापुर्वी प्रेम प्रकरणातून झालेल्या खुनाचा तपास अपुर्ण
मृतकाची आई मुक्ता उरकुडे ची पत्रकार परिषद

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ७ एप्रिल)
आरमोरी तालुक्यातील बोडधा या गावी
मागील वर्षी श्रीराम नवमी (दि.१७ एप्रिल २०२४) च्या दिवशी मृतक प्रशांत रामदास उरकुडे रा. बोडधा ता. आरमोरी जि. गडचिरोली गावातीलच लोकांनी गळा आवळुन खून केल्याची घटना घडली होती. प्रेम प्रकरणातून झालेल्या खुनाचा अजूनही तपास पुर्ण न झाल्याने त्याचा तपास करावा व आरोपीना कठोर शिक्षा करावी अशी मागणी आज (दि. ७ एप्रिल) ला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मयताची आई मुक्ता उरकुडे यांनी केलेली आहे. पत्रकार परिषदेला मयत प्रशांत चे मोठे वडील रमेश उरकुडे,मोठे वडील अमृत मारोती उरकुडे, काका सुभाष उरकुडे हजर होते.
माझी परिस्थिती हलाखीची असल्यामुळे माझ्या मयत मुलाच्या खुनाच्या तपासात आरमोरी पोलीस स्टेशन कुठलाही सहाय्य करत नाही हेतूपरस्पर दुर्लक्ष करत आहे असा आरोप देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुक्ता उरकुडे यांनी केलेला आहे.
श्रीराम नवमी उत्सवाच्या दिवशी गावात शोभायात्रा काढली असताना डीजे ची मिरवणूक सुरू होती त्या वेळेला आरोपी कडून माझ्या मुलाला फोन करून गावाबाहेर बोलवण्यात आले व त्याचा गळा आवळुन खून करण्यात आला व मृत शरीर गावातील एका शेतात फेकून देण्यात आले होते.
