जाहिरात
भ्रष्टाचार

नगरसेवक आशिष पिपरे यांनी केली ४० महिलांची फसवणूक

पत्रकार परिषद घेऊन दिला आत्मदहनाचा इशारा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १ एप्रिल)

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील भाजपचे नगरसेवक आशीष पिपरे यांच्या विरोधात महिलांनी फसवणूकीची तक्रार केली आहे. नगरसेवक आशीष पिपरे यांनी अगरबत्ती उद्योगासाठी ४० हून अधिक महिलांच्या नावावर कर्ज उचलून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप गुरुवार ३१ मार्च २०२५ रोजी महिलांनी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला.

सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रपरिषदेला कविता किरमे, दिलीप किरमे, वंदना कोठारे, शालिनी पिपरे, नंदकिशोर पिपरे, यांचेसह बहुसंख्येने पीडित महिला व पुरुष उपस्थित होते .

यावेळी अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली गैरव्यवहार केल्याच्या आरोपासह ट्रॅक्टर खरेदी- विक्री व्यवहार तसेच चिचडोह बॅरेजमध्ये अधिग्रहित केलेल्या जमिनीचा अधिकचा मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा आरोप त्यांचावर करण्यात आला. शिवम इंडस्ट्रीज चामोर्शीच्या नावे अगरबत्ती मशीन खरेदी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत  दिली आहे.

यासंदर्भातील सर्व पुराव्यानिशी पोलिस ठाणे व न्यायालयात तक्रार केली, पण दखल घेतली नाही. मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू असे पीडित महिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अगरबत्ती मशीनसाठी कर्ज मिळवून देतो असे सांगत कागदपत्रे घेतली. अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतल्या. पण मशीन आपल्याच घरी ठेवली. कर्जवसुलीसाठी बँकेची नोटीस प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. असे पीडित महिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button