जाहिरात
क्राईम

दीड लाख रुपयांची लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/भामरागड (दि. २७ मार्च)

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत प्राथमिक आरोग्य केंद्र, लाहेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी भोकरे (वय ३६, वर्ग-१) यांना १.३० लाख रुपयांची लाच रकमेची मागणी केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई २६ मार्च रोजी करण्यात आली. सदर कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ आणि नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांच्या रोखलेल्या पगाराच्या बिलावर सही करण्यासाठी डॉ. भोकरे यांनी १.५० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १.३० लाख रुपयांवर सौदा ठरला. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय तपास करुन सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, आरोपीने लाचेची मागणी केल्यावर तात्काळ कारवाई करत त्याला अटक करण्यात आली. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा परिसर नक्षल चळवळीने प्रभावित असूनही, पोलिसांनी धाडसी कारवाई केली. या घटनेमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडा मिळणार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button