जाहिरात
आपला जिल्हा

२९ मार्च ला जिल्हा युवासेने तर्फे निशुल्क पुर्व स्पर्धा परीक्षाचे आयोजन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २४ मार्च)

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळावे व जीवनातील ध्येय गाटता यावे याकरिता गडचिरोली जिल्हा युवासेनेच्या पुढाकाराने २९ मार्च रोजी निशुल्क स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आली.

पत्रकार परिषदेला शुभम सोरते राज्य विस्तारक व युवा सेना संघर्ष प्रमुख, वासुदेव शेडमाके जिल्हा प्रमुख (उबाठा) नंदू कुमरे विधानसभा संघटक, पवन गेडाम शिवसेना जिल्हा युवा अधिकारी, चेतन उरकुडे युवा तालुका अधिकारी, चेतन वानखेडे ग्रामीण युवा तालुका अधिकारी, पप्पू शेख शहर प्रमुख, वैभव सातपुते युवा शहर अधिकारी, गणेश धोटे यांचे सह अनेक युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेत हजर होते.

खालील विषयांच्या होणार परीक्षा
!!!
नीट-युजी मेडिकल, एमएचटी-सीईटी, फार्मसी, इंजिनीरिंग,लॉ आदी विषयांची होणार चाचणी परीक्षा

या केंद्रावर होणार परीक्षा
!!
१)गडचिरोली –
शिवाजी महाविद्यालय सायन्स कॉलेज गोकुलनगर
२)आरमोरी –
हितकरीणी महाविद्यालय

परीक्षेची वेळ
!!!
शनिवार २९ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळात होणार परीक्षा

या स्पर्धा परीक्षेच्या चाचणी परीक्षेला अधिकाधिक गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तरुणींनी सहभाग नोंदवावा अशी माहिती युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

गडचिरोली – 9511829012/8010740269
आरमोरी -7385610989
चामोर्शी -8766982312

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button