जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : २८ मार्चला पदवीधरांसाठी रोजगार मेळावा

गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचा उपक्रम

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२३ मार्च)

गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने २८ मार्च रोज शुक्रवार ला सकाळी १० ते ६ या वेळेत येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

५ हजार बेरोजगारांना मिळणार रोजगार
!!!
या मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ५ हजारांवर बेरोजगार पदवीधर यामध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.

४० कंपन्या होणार सहभागी
!!!
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सदर मेळाव्यात निर्मिती, आय.टी. ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग क्षेत्रातील राज्यभरातील सुमारे ४० नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे.

यांना मिळणार रोजगारांची संधी
!!!
पदवी शिक्षण घेत असलेले आणि पदवीधर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचे शिक्षण ज्या क्षेत्रातील आहे, त्या क्षेत्राशी संबंधित कंपनी उमेदवारांच्या मुलाखती घेतील. थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्याच ठिकाणी उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.

सदर रोजगार मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. ऑनलाईन नोंदणी सुरू असून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांवर पदवीधर बेरोजगार आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

नोंदणी झालेल्या उमेदवारांनी २७ मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे, संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button