जाहिरात
क्राईम

अभियंत्याकडून १० लक्ष रुपये खंडणी वसुल करणारी टोळी जेरबंद

१ पत्रकार व १ पुरुष पोलीस शिपाई १ महिला यांचा समावेश

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२९ जानेवारी)

गडचिरोली येथील एक शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांच्या तक्रार वरून, दि,३ जानेवारी २०२४ रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी फिर्यादीचा जुना मित्र सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेल मध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिल्याने फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी रुममध्ये थांबले असता, महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावुन त्यांच्याकडुन पैशाची मागणी केली. तसेच घटनाक्रमाचे दरम्यान आरोपी सुशील गवई (पोलीस कर्मचारी, नागपूर शहर) याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा. नागपूर) यास २८ हजार रुपये तसेच २ ते ३ लाख रुपये नगदी पेड केले असल्याचे भासविले असता, सर्व आरोपीतांनी संगणमताने बेकायेदेशिररित्या गुन्हेगारी स्वरुपाचा कट कारस्थान रचुन फिर्यादीवर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोधर राहीली आहे असा खोटा आरोप लावुन बलात्काराचा गुन्हा दाखल करुन फिर्यादीची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालुन हे प्रकरण मिटविण्यासाठी १० लाख रुपये पैशांची मागणी करुन पैसे देण्यास फिर्यादीवर जबरदस्ती केली असल्याच्या तोंडी रिपोर्ट वरुन अप क्र. ६०/२०२४ कलम ३८४, ३८९, १२० (ब) भादवि अन्वये पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपीतांचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले असता, गुन्हा दाखल होऊन अवघ्या २४ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने गोपनिय सुत्रधारांकडुन खात्रीशिर माहिती घेऊन अतिशय शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन गुन्ह्रातील आरोपी नामे १) सुशील गवई, रा. हिंगणा, नागपूर, २) रवीकांत कांबळे रा. नागपूर, ३) रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर ४) ईशानी रा. नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशिर कारवाईस्तव पोलीस स्टेशन गडचिरोली यांचे ताब्यात दिले. तसेच एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे.

वरील सर्व आरोपी यांना गडचिरोली पोलीसांनी आज संध्याकाळी अटक केली आहे. सदर गुन्ह्राचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे हे करत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button