पोलीस-नक्षल चकमकीत पोलीस जवान शहीद

लोकशाही न्युज, गडचिरोली/भामरागड (दि.११ फेब्रुवारी)
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण सीमावर्ती भागात असलेल्या भामरागड तालुक्यातील दिरंगी व फुलणार गावात आज दि.११ फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान पोलीस जवान महेश कवडू नागुलवार , विशेष अभियान पथक सी-६० गडचिरोली, वय- ३९ वर्षे, रा- अनखोडा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली हे जखमी झाले होते. त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून तातडीने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पोलीस जवान महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली आहे.
उद्या दि.१२ फेब्रुवारी रोजी त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात त्यांचे मूळ गाव मौजा अनखोडा ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे करण्यात येणार आहे.
२ मुलींचे पितृछत्र हरवले
¶¶¶
शहिद पोलिस जवान महेश कवडू नागुलवार हे २०१२ ला पोलीस भरती सामील झाले होते.
त्यांना लग्नानंतर २ मुली आहेत.आज त्या दोन मुलीचे पितृछत्र हरवले आहे.
