गडचिरोली : हिरापूर, राखी, गुरवळा, शिरपूर शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशावर बहिष्कार

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.३० जून)
राज्यभरात ३० जून ला शाळा प्रवेशोत्सव सुरू असताना, गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, राखी, गुरवळा, शिरपूर या परिसरातील प्रस्तावित विमानतळाचा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हिरापूर आणि गुरवळा या गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांसह मंगळवारी ३० जून ला शाळेसमोर आंदोलन करीत पहिल्याच दिवशी प्रवेशावर बहिष्कार घातला. प्रस्तावित विमानतळासाठी आपल्या सुपीक जमिनी सरकारला न देण्याच्या मुद्द्द्यावरून आमच्या सुपीक शेत्या जर उरणार नसतील तर आम्ही मुलांना शिक्षण देऊन फायदा काय.
विमानतळासाठी काढलेला शासनाचा जीआर रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेत जाणार नाही. अशी ठाम भूमिका घेत हिरापूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत न जाण्याचा निर्णय घेत शाळेच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन केले.
गडचिरोली विमानतळासाठी जंगल व इतर जमीनींच्या अधिग्रहणाच्या पुढील कार्यवाहीसाठी एजंसी नेमण्यात संदर्भात नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झाली. आणि पुन्हा एकदा नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. भूमी अधिग्रहणाच्या आंदोलनात सहपालक मंत्री यांनी आंदोलकांना भूमी अधिग्रहण संदर्भात स्थगिती दिल्याचे आश्वासन दिले आहे.
