मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर “अर्ध नग्न” आंदोलन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ ऑगस्ट)
संपादक : संदिप कांबळे
आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांच्या कार्यकाळात कामे आणि खरेदी व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी कारवाई करण्यासाठी वनसंरक्षक कार्यालयासमोर प्रारंभ केलेले उपोषण अजूनही सुरूच आहे.विशेष म्हणजे कारवाईची एकच मागणी पूर्ण होत नसल्याने आंदोलक विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. दरम्यान मंगळवार ला वनसंरक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या आंदोलन मंडपात आंदोलकांनी अर्ध नग्न आंदोलन केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन चिघळवण्याचा निर्धार करीत अखिल भारतीय परिषद चे अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी आधीच प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा देऊन केला आहे.
आज आंदोलनाचा १४ वा दिवस शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. त्यात सहभागी योगाजी कुडवे,रवीन्द्र सेलोटे,नीळकंठ संदोकर,चंद्रशेखर सिडाम,आकाश मट्टामी,प्रणय खुणे,शंकर ढोलगे, विलास भानारकर,
कलम शहा आदी आंदोलन कर्ते उपस्थित होते.
