जाहिरात
भ्रष्टाचार

अखेर “त्या’ भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांचे निलंबन

वन विभागाने घेतला योगाजी कुडवे व प्रणय खुणे यांच्या आंदोलनाचा धसका

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ ऑगस्ट)
संपादक : संदिप कांबळे

आल्लापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांच्या कार्यकाळात कामे आणि खरेदी व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी कारवाई करण्यासाठी वनसंरक्षक कार्यालयासमोर प्रारंभ केलेले आंदोलन आज अखेर त्यांच्या निलंबनाच्या कारवाईने संपन्न झाले.

(योगेश शेरेकर आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित केल्याचे मुख्य वनसंरक्षक कार्यालय रमेश कुमार यांचे पत्र)

सदरचे आंदोलन १४ व्या दिवशी समाप्त झाले, आंदोलन कर्त्याना योगेश शेरेकर निलंबनाचे पत्र प्राप्त होताच मोठा जल्लोष व फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

आंदोलनात सहभागी योगाजी कुडवे,प्रणय खुणे, शंकर ढोलगे,रवीन्द्र सेलोटे,नीळकंठ संदोकर,चंद्रशेखर सिडाम,आकाश मट्टामी,विलास भानारकर,
कलम शहा आदी आंदोलन कर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

योगाजी कुडवे यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयापुढे आजपर्यंत आंदोलन करून जवळपास १८ अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित केले आहे ही बाब विशेष.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button