जाहिरात
क्रीडापत्रकार परिषद

गडचिरोली : ५ फेब्रुवारी पासुन लॉयड्सतर्फे ‘जीडीपीएल’ चा रोमांच

क्रिकेटर रवी शास्त्री यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली (दि.२ फेब्रुवारी)

लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडतर्फे गडचिरोली डिस्ट्रिक प्रीमीअर लिगचा थरार बुधवार ५ फेब्रुवारीपासून गडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स परिसरातील कोटगल रोड वरील एमआयडीसी पटांगणावर रंगणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू तथा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री येणार असल्याची माहिती लॉयड्सचे कार्यकारी संचालक एस. एस. खांडवावाला यांनी चामोर्शी रोड स्थित लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड गडचिरोलीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत दिली. पत्रकार परिषदेला कर्नल विक्रम मेहता,भोलू सोमनानी, रोमित तोमरलावार उपस्थित होते.

स्थानिक खेळाडूंना त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदाच लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडकडून गडचिरोली डिस्ट्रिक प्रीमीअर लिगचे आयोजन यावर्षी करण्यात आले आहे. या लिगमध्ये जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील संघ, पोलीस, वन आणि महसूल विभाग तसेच लॉयड्स मेटल्सचा संघ सहभागी होत आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन
¶¶¶
५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू तथा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते होणार आहे. पहिला सामना सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. या लिगमधील सामने दिवस व रात्रकालिन असल्याची माहिती एस. एस. खांडवावाला यांनी दिली. या लिगसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून एमआयडीसीमध्ये तयार करण्यात आलेली खेळपटी आंतरराष्ट्रीय खेळपटीनुसार तीन खेळपट्या तयार करण्यात आल्या आहेत.या लिगमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. जे स्पर्धेतील मुख्य आकर्षण असणार आहे. उद्घाटनानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा मार्च पास्ट होणार आहे. ही स्पर्धा गडचिरोलीकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

सामन्यांच्या वेळा
¶¶
पहिला सामना दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तर दुसरा सामना सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत होणार आहे.

सामने बघण्याकरिता मोफत येण्या- जाण्याची सोय
¶¶¶
कॉम्प्लेक्स परिसरातील एमआयडीसी मैदानावर होत असलेल्या या क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्याकरिता क्रिकेट रसिकांना इंदिरा गांधी चौक ते एमआयडीसी ग्राउंड पर्यंत मोफत येण्या जाण्याची सोय आयोजकांनी केलेली आहे.

मैदान परिसरात स्टॉल्स व दुकाने लावण्याची व्यवस्था
¶¶¶
स्पर्धेच्या परिसरात विविध स्टॉल्स व दुकाने लागणार आहेत याकरिता त्यांना मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे ज्यांना स्टॉल दुकाने लावायचे आहेत त्यांनी आयोजकाशी संपर्क साधावा असे सुद्धा आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button