जाहिरात
ताज्या घडामोडीपत्रकार परिषद

२४ एप्रिल पासुन व्हीसीए टी-२० क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीत

Spread the love

लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि.१८ एप्रिल)

विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यांच्या वतीने यंदा गडचिरोलीत व्हीसीए टी-२० क्रिकेट (लेदर बॉल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे ही स्पर्धा २४ एप्रिल पासून तर ३० एप्रिल या कालावधीत धानोरा रोड स्थित जिल्हा प्रेक्षगार मैदानावर रंगणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अमरावतीत खेळविल्या जाणार आहे.अशी माहिती आज (दि. १८ एप्रिल) रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला मंगेश देशमुख, अजय बर्लावार, सचिन मडावी, आर्यन वरघंटीवार, आशिष बावनकुळे, प्रशांत भुपाल हे उपस्थित होते.

या स्पर्धेत विदर्भातील एकूण १० संघ सहभागी होणार आहेत गडचिरोली व अमरावती असे दोन विभाग करण्यात आलेले आहेत. गडचिरोली विभागात अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ हे संघ प्रतिनिधित्व करतील तर अमरावतीमध्ये वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, नागपूर हे संघ प्रतिनिधित्व करणार आहेत.

प्रत्येक संघात १६ खेळाडू असणार आहेत त्यापैकी ११ स्थानिक व ५ आयकॉन खेळाडू असणार आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा खेळाडूंसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या खेळाडूतूनच विदर्भाचा टी-२० संघ निवडला जाणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बडकस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनीय सामना अमरावती विरुद्ध भंडारा या दोन संघात सकाळी ८ वाजता खेळविल्या जाणार आहे. दुपारचा सामना दुपारी २ वाजता खेळविला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button