ट्रक च्या अपघातात परिचरिकेचा मृत्यू

लोकशाही न्युज, सावली/मुल (दि,१३ नोव्हेंबर)
सुरजागड लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत जुनासुरला येथे कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिकेचा चांदापुर फाटा येथे अपघात झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी ३ वाजता च्या सुमारास चांदापुर फाटा येथे आज घडली आहे.
सविस्तर वृत्त,असे आहे की, मृतक कु.मंदा करपल्लीवर वय-४५ राहणार मूल ह्या आपल्या दुचाकी वाहन क्रमांक MH-34-AX-9370 या वाहनाने जुनासुरला येथे जात होत्या रस्त्यात त्यांच्या मोबाईल ची रिंग आल्याने संभाषणासाठी त्या दुचाकी वाहनाने थांबल्या. त्याच क्षणी गोंडपिपरी वरून येणाऱ्या सुरजागड ची लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रमांक MH-40-CT 9370 ह्या वाहनाने जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की मृतक कु.मंदा करपलीवार हिच्या शरीराचे तुकडे झाले.
अपघातानंतर मुल येथील पोलीस घटनास्थळावर पोहचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता मूल उप जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.ट्रक चालक अपघातानंतर फरार झालेला आहे ट्रक ताब्यामध्ये घेण्यात आलेला असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
