जाहिरात
विधानसभा गडचिरोली

गडचिरोली: काँग्रेसचे मनोहर पोरेटी विरुद्ध भाजपाचे मिलिंद नरोटे यांच्यात दुहेरी लढत

डॉ.देवराव होळी, विश्वजीत कोवासे यांची माघार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,५ नोव्हेंबर)

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा-६८ क्षेत्राकरिता होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मनोहर पोरेटी विरुद्ध भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्यात दुहेरी सामना रंगणार हे आता उघड झाले आहे. दोन्ही उमेदवाराची ही विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे. या दोघात होणाऱ्या अत्यंत चुरशीच्या लढतीत विजयी उमेदवार कोन ठरतो हे पाहण्याजोगे आहे.निवडणुकीच्या मैदानात ९ उमेदवार आहेत.

आमदार डॉ.देवराव होळी, एडवोकेट विश्वजीत कोवासे यांची उमेदवारी मागे
¶¶¶
विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी वाढवण्याचे काम केले होते. तसेच काँग्रेसचे एडवोकेट विश्वजीत कोवासे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढवली होती पण ऐन वेळेवर या दोघांनीही आपली उमेदवारी मागे घेतल्याने आता खरी चुरस निर्माण झालेली आहे. अपक्ष म्हणून लढाई लढणाऱ्या होळी, कोवासे यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडून मनधरणी करण्यात जवळपास शंभर टक्के यश प्राप्त झालेले आहे.त्यांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

काँग्रेस-महाविकास आघाडी कडून (उबाठा) गट व राष्ट्रवादी शरद पवार गट प्रचारात उतरलेले आहेत. तसेच भाजपा- महायुतीकडून शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट हे देखील प्रचारात उतरले आहेत. येत्या काळात प्रचारात कोण कोणावर भारी पडतो व कोण-कुणाचा पराभव करतो हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

काँग्रेस व भाजपा मधील बंडखोरांनी उमेदवारी माघार घेतल्याने आता थेट लढत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी होणार आहे त्यामुळे येत्या काळात प्रचार अधिक कोण करतो व आपआपल्या पक्षासाठी मते कसे मिळवतो हे येत्या २० नोव्हेंबर होणाऱ्या मतदानातून व २३ नोव्हेंबर ला मतमोजणीतुन दिसणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button