जाहिरात
ब्रेकिंग न्युज

गडचिरोली: आमदार देवराव होळी हे आपला नामांकन अर्ज माघे घेणार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३ नोव्हेंबर)

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरिता विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी वाढवण्याचे काम केले आहे.२ टर्म आमदार राहिलेल्या डॉ.देवराव होळी यांची ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून लढाई लढण्याचा निर्धार केला होता.पण ते उद्या दि, ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे माघार घेणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.

भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार डॉक्टर होळी याने अपक्ष लढण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला खूप मोठे ग्रहण लागलेले असून येत्या काळात भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसण्याची शक्यता होती. पण भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड दबावात त्यांनी आपला अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे त्यामुळे डॉक्टर देवराव होळी हे पक्षातच राहून भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार आहेत.

आज आमदार परिनय फुके गडचिरोली आले असता त्यांनी शिष्टाई करून चर्चा घडवून आणली.परिणामी विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी २९ ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ४ नोव्हेंबरला आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button