जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : मैत्रीपूर्ण सामन्यात लोकप्रतिनिधी संघाने पत्रकार संघावर ३ धावांनी केली मात

अमोल कुळमेथे ठरले सामनावीर

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २६ जानेवारी)

स्वतंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रबोधिनी तर्फे दरवर्षी २६ जानेवारीला लोकप्रतिनिधी विरुध्द पत्रकार मैत्रीपुर्ण क्रिकेट सामना शिवाजी महाविद्यालय च्या बाजूला स्व. गंगुवार मैदानात घेण्यात आला. आज झालेल्या सामन्यात लोकप्रतिनिधी संघाने पत्रकार संघावर अवघ्या ३ धावांनी निसटता विजय मिळवला. लोकप्रतिनिधी संघाचे अमोल कुळमेथे यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

लोकप्रतिनिधी संघाचे कर्णधार माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकताच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधी संघाकडून खासदार अशोक नेते, डॉ. प्रणय खुणे,आमदार डॉ. मिलिंद नरोटे, हेमंत राठी, अमोल कुळमेथे, नगरसेवक शेखर आखाडे, हेमंत जम्बेवार, बंटी खडसे,अनिल तिडके यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत १२ षटकात ८८ धावा काढल्या.

८८ धावांचा पाठलाग करताना पत्रकार संघाला १२ षटकात ८९ धावांची गरज होती. पत्रकार संघाकडून एका मागोमाग एक खेळाडू बाद होत गेले. पण सामना जिंकण्यासाठी त्यांना अवघ्या ३ धावा कमी पडल्या. पत्रकार संघ सर्वबाद ८५ धावाच काढु शकला. पत्रकार संघाकडून रुपराज वाकोडे, डॉ. यशवंत दुर्गे संदीप कांबळे,निलेश पटले, आशुतोष कोरडे, नितीन ठाकरे यांनी शर्तीचे प्रयत्न केले पण आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.

सामन्यानंतर बक्षीस वितरण करताना फिरते चषक लोकप्रतिनिधी संघाला पत्रकार संघाकडून बहाल करण्यात आले. सामना यशस्वी होण्यासाठी पत्रकार संघाने मोलाची मदत केली. सामन्याचा आस्वाद घेण्याकरीता गडचिरोली शहरातील अनेक क्रिकेट शोकीन मैदानात हजर होते. सामना संपेपर्यंत कुणीही प्रेक्षकांनी मैदान सोडला नाही.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button