वनसंरक्षक कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन,खासदार अशोक नेते यांची ठिय्या आंदोलनाला भेट

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१९ ऑगस्ट)
संपादक : संदीप कांबळे
आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कामात तसेच निधी खर्चात झालेल्या कोट्यवधीचा भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे योगाजी कुडवे यांनी ९ ऑगस्टपासून मुख्य वनविभाग कार्यालय (प्रादेशिक) समोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. मात्र आंदोलनाच्या ९ दिवसानंतरही वरिष्ठ स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करत आज कार्यलयासमोर भीक मांगो आंदोलन केले आहे.
आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या झिमेला, तलवाडा, आलापल्ली या उपक्षेत्रात गुरे प्रतिबंधक चर खोदकाम तसेच अनेक कुप कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करीत आदिवासी मजुरांच्या खोट्या साह्या करून सदर रक्कम परस्पर हडप करण्यात आली असून. या कामाची सखोल चौकशी करून संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षकांना तत्काळ निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.
पुढील दिवसात होणार अश्या प्रकारे आंदोलन
¶¶¶¶
जोपर्यंत दोषींवर यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत सदर आंदोलन कायम ठेवणार असून तो अधिक तीव्र करण्याचा निर्धार योगाजी कुडवे आंदोलक सहकारी हे शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी वनवृत्त कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन, सोमवार२१ ऑगस्टला घंटानाद आंदोलन, २२ ऑगस्ट अर्धनग्न आंदोलन,२३ ऑगस्ट मुंडन आंदोलन तर २४ ऑगस्ट रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे.

खासदार अशोक नेते गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र यांची आंदोलन स्थळाला भेट
¶¶¶
गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली येथे सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलना ला भेट दिली. आज आंदोलकांचा १० वा दिवस होता.
आंदोलकांच्या समस्या जाणून घेऊन या संबंधित योग्य ती कार्यवाही केली जाईल. हा प्रकार वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बोलून निकाली काढण्याचा माझा प्रयत्न राहील. निश्चितच आपणांला योग्य न्याय मिळेल. असे आंदोलकांना भेटी दरम्यान खासदारांनी सांगितले.
यावेळी वनविभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक रमेश कुमार,शंकर ढोलगे,प्रणय खुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, योगाजी कुडवे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली अखिल भारतीय सरपंच परिषद
व आंदोलन कर्ते हजर होते.
