२५ ऑगस्ट ला वनसंरक्षक कार्यालयासमोर करणार आत्मदहन,योगाजी कुडवे व सहकाऱ्यांचा इशारा
आंदोलकांनी केले ढोल बजाव आंदोलन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२१ ऑगस्ट)
संपादक : संदीप कांबळे
आलापल्ली वनपरिक्षेत्रातील कामात तसेच निधी खर्चात झालेल्या कोट्यवधीचा भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित वनाधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे योगाजी कुडवे यांनी ९ ऑगस्टपासून मुख्य वनविभाग कार्यालय (प्रादेशिक) समोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. मात्र आंदोलनाच्या १३ दिवसानंतरही वरिष्ठ स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करत आज कार्यलयासमोर ढोल बजाव आंदोलन केले आहे.
(पत्रकार परिषदेतून योगाजी कुडवे व सहकाऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा)
¶¶¶
येत्या २५ ऑगस्टला आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलनकारी योगाजी कुडवे व आंदोलनातील सहकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा दिला आहे.
आलापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या झिमेला, तलवाडा, आलापल्ली या उपक्षेत्रात गुरे प्रतिबंधक चर खोदकाम तसेच अनेक कुप कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करीत आदिवासी मजुरांच्या खोट्या साह्या करून सदर रक्कम परस्पर हडप करण्यात आली असून. या कामाची सखोल चौकशी करून संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षकांना तत्काळ निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन योगाजी कुडवे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.

(मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करताना आंदोलनकर्ते)
आज झालेल्या ढोल बजाव आंदोलनात योगाजी कुडवे यांच्यासह प्रणय खुणे,शंकर ढोलके, नीलकंठ संदोकर,
ढोल बजावं आंदोलनात आज आकाश मठ्ठामी, रवींद्र शेलोटे, आशिष नक्षीने, अरुण देशमुख, चंद्रशेखर सीडाम, लोमेश कोहळे, लोकेश डोंगरवार, त्रिंबक लोणबले, हिवराज कांबळे, सुरेश नागापुरे, लोमेश लाडवे, विश्वास लाडवे, रमेश लाडवे, स्वप्निल बोबाटे, श्रीधर राऊत, ईश्वर तिवारी, मोरेश्वर नागापुरे, अरविंद देशमुख यांचा सहभाग होता.
