जाहिरात
चिमुरब्रेकिंग न्युज

ब्रेकिंग,,मुले चोरणाऱ्या टोळीचा चिमूर शहरात आगमन

अन त्या मुलीने झटका मारुन केली कशीबशी सुटका.

Spread the love

नागरिकांनी पालकांनी जागरूक राहून सतर्कता बाळगण्याचे चिमुर पोलीसा॓चे आवाहन

समाजमाध्यमावर होत आहे आपबिती सांगणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

प्रतिनीधी-प्रवीण वाघे (दि,२९ सप्टेंबर)

सावधान चिमूर नगरीत मुले चोरणाऱ्या टोळीचा आगमन झाले असून लहान मुलांना वेगवेगळे अमिष दाखवून आपल्याकडे आकर्षित करीत पळवून नेण्याचे प्रयत्न ही टोळी करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असल्याचे निदर्शनास आले असून तीन महिला चिमूर येथील आबादी वार्ड च्या एका मुलीला रुमाल घेण्याचे सांगून तसेच एका पत्यावर यायला सांगून तुज्या गावाकडील लोकांनी तुला बोलावले आहे असे सांगून तिला पकडले असता प्रसंवधान राखून ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटून पळाली.

अशी आपबिती मुलीने सांगितले आहे त्यामुळे सदर महिला हया मुले चोरणाऱ्या गँगच्या असाव्यात असा संशय व्यक्त करण्यात येत आहेत.
घटनेची माहीती चिमुर पोलीसा॓ना देन्यात आली माहीती मिळताच ठाणेदार मनोज गभने साहेब हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले.व आजुबाजुच्या परीसरात चोख बंदोबस्त कसुन चौकशी चालु आहे.
तेंव्हा पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देऊन सतर्कता बाळगावी असे आवाहन चिमुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार गभने साहेब या॓च्याकडून करण्यात येत आहे तसेच नागरिकांनी सुद्धा असे प्रकार घडू नये यासाठी नेहमीच जागरूक राहावे सतर्क राहावे.
सदर मुले चोरणारी टोळी ही लहान मुलांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांना अमिष दाखवून चोरून नेतात असे अनेक प्रकार अनेक शहरात घडत आहेत ह्या टोळीमध्ये पुरुष तसेच महिलांची संख्या जास्त असते तेंव्हा नागरिकांनी दक्ष राहून जागरूक राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button