जाहिरात
गडचिरोली

महा अंनिस चे वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न.

Spread the love

गडचिरोली (दि,२ ऑगष्ट)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर शाखा गडचिरोली चे वतीने धानोरा रोड वरील कार्मेल शाळेच्या मागे शिवमंदिर येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महा अंनिस चे माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री डी डी सोनटक्के, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड चे जिल्हा प्रमुख श्री मारोती दुधबावरे, वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्पाचे सहकार्य राज्य सहकार्य श्री विलास निंभोरकर व जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे जिल्हा प्रधान सचिव श्री विलास पारखी जिल्हा उपाध्यक्ष श्री कमलाकरवार के श्री पुरुषोत्तम ठाकरे श्री पुरुषोत्तम चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री सोनटक्के सर यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, कोणतेही महापुरुष हे तळागाळातील लोकांचे आयुष्य सुखात जाण्यासाठी स्वत: अत्यंत बिकट परिस्थितीत खचून न जाता अनंत हालअपेष्टा भोगूनही व त्या बदल्यात समाजाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता सतत नंदा दिप होऊन लोकांना सूख मिळवून देतात परंतु त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढ्यांना माहीत करून देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे आवश्यक आहे व हे कार्य महा अंनिस चे कार्यकर्ते न चुकता करीत असतात ही आनंदाची बाब आहे. अशा कार्यक्रमात समाजाचा पाहिजे तसा सहकार्य मिळत नाही. ते कसे मिळविता येईल या दृष्टीने ही प्रयत्न व्हावेत असे आवाहन केले. श्री दुधबावरे यांनी संत तुकाराम महाराज व श्री तुकाराम साठे यांच्या कार्यातील साम्य लक्षात घेऊन त्यांच्यावर कसा अन्याय होत आला या विषयी विस्तृतपणे माहिती दिली. श्री निंबोरकर यांनी बहूजन समाजातील थोर संत महापुरुषांनी केलेल्या कार्याकडे याच समाजातील शिकल्या सवरलेल्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांचे कार्य हिमालयाएवढे असूनही ते दुर्लक्षित राहिले. त्यांना त्यांच्या जातीचे लेबल लावून त्यांना जातीतच बांधून ठेवल्या गेले जेव्हा की या महापुरुषांचे कार्य पाहिले की एकाने पुढे आणलेले कार्य दुसऱ्याने पूढे नेण्याचे काम करीत राहिले म्हणून आपले लेखन हे दुसऱ्याला समर्पित करतांना दिसतात. म्हणून कोणत्याही महापुरुषांचे किंवा संत समाजसुधारकांचे स्मृतिदिन असो अथवा जयंत्या त्या केवळ एका एका जातीत न करता सर्वसमावेशक पद्धतीने केल्यासच त्यांच्या कार्याचा गौरव होईल असे महत्त्वपूर्ण विषद केले. श्री विलास पारखी यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विस्तृत विवेचन केले. श्री पुरुषोत्तम ठाकरे, श्री पुरुषोत्तम चौधरी, श्री विठ्ठल कोठारे, श्री लहुजी रामटेके यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर शाखेचे कार्याध्यक्ष श्री दामोधर ऊप्परवार यांनी तर आभारप्रदर्शन श्री गोविंदराव ब्राम्हणवाडे जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमाला श्री वामनराव भोयर, श्री प्रभाकर भागडकर, श्री नन्नावरे, दुधबावरे आदी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button