जाहिरात
राजकीयसावली

शिवसेना पक्ष सावली तालुका प्रमुख पदी उमेश गोलेपल्लीवार यांची नियुक्ती

Spread the love

लोकशाही न्युज, सावली (दि,२६ ऑगष्ट)

सावली तालुक्यातील जनसेवा न्युजचे संपादक म्हणून कार्यरत असलेले जिबगांव येथील  उमेश गोलेपल्लीवार यांची शिवसेना पक्ष सावली तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

पूज्य हिंदुहृदयसम्राट बाळ ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना प्रमुख नेते  एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार त्यांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख (क्षेत्र सावली तालुका) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पूज्य हिंदुहृदयसम्राट बाळ ठाकरे यांच्या हिंदुत्व विचाराचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसार तुम्ही सक्रियपणे करावे आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे असा विश्वास शिवसेना सचिव संजय मोरे यांनी वर्तविला आहे.

शिवसेना पक्ष सावली तालुका प्रमुख पदी उमेश गोलेपल्लीवार यांची नियुक्ती झाल्याची माहिती  तालुक्यात होतच त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button