जाहिरात
रणधुमाळीविधानसभा गडचिरोली

गडचिरोली : “त्या” अधिकांना पडत आहेत आमदारकीचे स्वप्न

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२६ ऑगष्ट)

गडचिरोली आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध अनेकांना लागले असून, ही मंडळी आतापासूनच स्वतःच्या नावापुढे भावी आमदार असे लावून मिरविताना दिसत आहे. त्यात काही इच्छुक उमेदवाराचा समावेश असून, इच्छुकांच्या रांगेत आपणही असल्याचे त्यांच्याकडून दाखवून दिले जात आहे. मात्र उमेदवारीची तिकीट मिळविण्यासाठी काय प्रयत्न व कसरत करावी लागते हे त्यांनाच माहित.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यांत लागण्याची शक्यता असल्याने, राजकीय मंडळींनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गडचिरोली विधासभेत तर स्थानिक इंदिरा गांधी चौकातील चारही बाजूला त्यांचे चाहत्याकडून लावलेले जाहिरात व जाहिरातींवर भावी आमदार म्हणुन लावलेली खासम खास शैली यावर झडकत आहे.

हौसे,नवसे यांनाही आले उत
¶¶¶
शहरातील राजेशाही जीवन जगणारा राजकीय पक्षाचा पदाधिकारी सध्या गावातील गरिबांच्या घरी जाऊन त्यांच्या खाठेवर बसून त्यांची विचारपूस करून त्याची विडिओ बनवून फेसबुक वर प्रकाशित करून स्वतःला धन्य समजत आहे.
राजकीय पक्षात राहून चटया उचलणारे व झेंडे फडकवणारे,पांढरे इस्त्री चे कपडे लावणारे राजकारणी यांनाही आता राजकारणात आपणच उमेदवार आहोत असे वाटत आहे.साधा नगरपरिषद मध्ये नगरसेवक म्हणूनही न निवडून आलेला ही उमेदवार आपणही मुंबईतील विधानसभेत जाऊन आमदारकी मिरवावी असे होऊन गेले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button