जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

वाघाच्या हल्ल्यात किशोर ठार

Spread the love

गडचिरोली (दि,२६ जून)

गडचिरोली मुख्यालयापासून १५ किलोमीटर दूर असलेल्या पोर्ला वनपरिक्षेत्र हद्दीत मंडोबा देवस्थान जवळ आज सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे . मृतकाचे नाव किशोर तुळशीराम मामीडवार (वय ३६ वर्ष रा, पोरला) आहे . मृत झालेली व्यक्ती ही जंगलात झुडुपी जंगल चे सरपण गोळा करण्याकरिता गेली होती त्याच्या सोबत आणखी एक इसम गेला होता पण तो सुखरूप गावात आला .

वनविभाग व पोलिसांच्या मदतीने ठार झालेल्या इसमाचे मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.
वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने वारंवार अश्या घटनांना सामोरे जावे लागत आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button