देसाईगंज येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन
देसाईगंज/वडसा (दि,१२ऑगष्ट)
स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव तथा जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा गडचिरोली आर्थिक विकास महामंडळ व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने १२ ऑगस्ट ला श्री गजानन मंदिर नयनपुर रोड देसाईगंज येथे रानभाजी महोत्सव चे आयोजन करण्यात आलेले आहे सदर रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी वडसा प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद अभियानाचे प्रतिनिधी असणार आहेत सदर रानभावी महोत्सवात वडसा आरमोरी तालुक्यातील शेतकरी जंगलातून रानभाजी चे संकलन करून स्टॉल लावणार आहेत सदर स्टॉलमध्ये अत्यंत पौष्टिक अशा रान भाजीचे विक्री व स्टॉल लावण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर रानबाजी महोत्सव सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे गडचिरोली जिल्हा हा रानभाज्यासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे सध्या स्थितीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उपलब्ध होत असतात मात्र लोकांना रान भाजी बद्दलचे माहिती नसल्यामुळे रानभाजी चा उपयोग आपल्या जेवणात सामान्य व्यक्ती करू शकत नाही त्यामुळे सदर रानभाज्यांच्या महोत्सव आयोजन करून रानभाज्या बद्दलची माहिती व ग्रामीण भागातील शेतकरी व लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची एकमेव उद्देश आहे यावेळी असे मत आत्मा येतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
