शुभम गुप्ता यांना आयएएस पदावरून दुर करा व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा
प्रणय खुणे व पीडितांची पत्रकार परिषद

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२३ ऑगष्ट)
राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा अतिमागास, आदिवासी म्हणून प्रचलित आहे.या जिल्यात भामरागड व एटापल्ली तालुका हे राज्यपालाने दत्तक घेतलेले तालुके आहेत. या तालुक्यात आदिवासी लोकांना शासन हजारो नाही तर करोडो रुपयांच्या योजना राबवून त्यांना वर आणण्याचा प्रयत्न करीत असतो. पण या तालुक्यात गाय वाटप घोटाळ्यात दोषी असलेले तत्कालिन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता आयएएस यांना निलबिंत करून अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी राष्ट्रीय मानवधिकार संघटन (असोसिएशन) नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांचेसह भामरागड व एटापल्ली तालुक्यातील पिडीत यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
भामरागड येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी सन २०२१ ते २०२३ मधे गाय वाटप योजने अंतर्गत लाखो रुपयाचा गैरव्यवहार केला. अप्पर आयुक्त यांच्या चौकशीत गुप्ता दोषी आढळले. आदिवासी समाजातील लाभार्थी व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करून धमकावणे, शेकडो कोटीचा भ्रष्टाचार करणे, एटापल्ली येथे कार्यरत असतांना कंत्राटदारांना धमकावणे.भामरागड येथील आदिवासी महिला भारती इष्टाम या आदिवासी महिलेचा छळ करणे, आपल्या पदाला दुरुपयोग करून अनेकांवर गुन्हे दाखल करणे आदि कारनामे करणाऱ्या शुभम गुप्ता यांचेवर गुन्हा दाखल करून अट्रोसिटी अतंर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रणय खुणे, नगरसेवक मनोहर बोरकर, आदिवासी महिला भारती इष्टम, यशोदा देऊ पुंगाटी, शंकर ढोलगे, विनोद चव्हाण यांचेसह भामरागड व एटापल्ली तालुक्यातील अनेक पिडीत हजर होते.
