जाहिरात
गडचिरोलीराजकीय

२४ ऑगष्ट ला गडचिरोली बंदची हाक

महाविकास आघाडी ची पत्रकार परिषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२३ ऑगष्ट)

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणा-या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अमानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. ज्या शाळेत हे अत्याचार झाले ती शाळा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांची आहे. सत्ताधारी लोकांशी संबंधित लोक यामध्ये सहभागी असल्याने पोलीस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

पीडित मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांना त्या गरोदर मातेला ११ तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. हे पोलीस आणि सरकारच्या गलथान कारभाराचे आणि असंवदेशीलतेचे ज्वलंत उदाहरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्री जिल्ह्यातच माता, भगिनी, महिला सुरक्षित नाही तर राज्यातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कशी असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलापूर येथील चिमुकल्या चार वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारली आहे. त्याच तत्त्वावर गडचिरोली येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्या २४ ऑगस्टला गडचिरोली बंद चा नारा दिलेला आहे.

हा बंद सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत पाळला जाणार आहे.यात प्रामुख्याने व्यापार प्रतिष्ठान, शाळा,महाविद्यालय बंद राहणार आहेत. पत्रकार परिषदेला खासदार डॉ.नामदेव किरसान (गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र),काँग्रेस गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,राम मेश्राम माजी नगराध्यक्ष, वासुदेव शेडमाके जिल्हाध्यक्ष (उबाठा गट),सतीश विधाते शहराध्यक्ष काँग्रेस,विजय गोरडवार शहराध्यक्ष (शरदचंद्र पवार गट), डॉ.सोनल कोवे काँग्रेस कार्यकर्त्या, छाया कुंभारे महिला जिल्हाध्यक्ष (उबाठा गट),शीतल ठवरे शहराध्यक्ष (उबाठा गट), नंदू कुमरे, प्रकाश ताकसंडे यांचे सह महाविकास आघाडी तील अनेक मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button