सिंदेवाही
घरात घुसून वाघाने महिलेला केले ठार
उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज
सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा गावात राहणाऱ्या पेंदाम यांच्या घरात घुसून पट्टेदार वाघाने एका झोपलेल्या महिले वर हल्ला केला. त्या हल्यात महिला ठार झाल्याची घटना २८ एप्रिल गुरूवार ला पहाटे ०१:३० वाजता च्या सुमारास घडली.
मृतक महिले चे नाव सायत्राबाई परसराम पेंदाम वय ८७ रा. चिकमारा तालुका सिंदेवाही येथील असुन सदर
महिला घरात झोपली असता पहाटे ०१:३० वाजता एका पट्टेदार वाघाने घरात घुसून त्या महिलेला ठार केले.
ही माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही यांना मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार घारे, पि.एस.आय गेडाम, पो.ह. वा गेडेकर, राहुल रहाटे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करीत पुढील तपास सुरू आहे.
जाहिरात
