
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ ऑगष्ट)
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली येथील ठवरे हॉस्पीटल येथे शहर प्रमुख शितल राहूल ठवरे यांच्या राहत्या घरी जनसंपर्क कार्यालयाची स्थापना मान्यवर मंडळी च्या हस्ते करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटक अल्का दलाल माजी नगरसेविका महानगर पालिका नागपूर, तसेच गडचिरोलीचे संपर्क प्रमुख यानी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव झोरे (मुंबई) विधानसभा संपर्क प्रमुख गडचिरोली यांनी केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून छाया कुभांरे जिल्हा संघटीका, वासुदेवजी शेडमाके जिल्हाप्रमुख, अजय दलाल माजी नगरसेवक नागपूर,श्री लांजेकर विधानसभा समन्वयक,तसेच युवा सेनेचे प्रमुख पवन गेडाम, किरण शेडमाके,नवनाथ उके, प्रफुल मेश्राम हे प्रामुख्याने हजर होते.
भगवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी महिलांनी भगवा हाती घेतला. भगवा सप्ताह निमीत्य, दि ४ ऑगष्ट ते ११ ऑगष्ट या कालावधीत घरोघरी भगवा प्रचार पोहचून व प्रसार करणे. लोकांच्या भेटी घेऊन पक्षात सहभागी करून त्यांचे फार्म भरून घेणे, वार्डनिहाय सभा घेऊन जनजागृती करणे हे कार्यक्रम राबविण्यात आहे.तसेच उपस्थित महिलांना शिवबंधन बांधण्यात आले. व पक्ष प्रवेश करून करण्यात आला.
यावेळी श्रीमती कल्पना साखरे,अर्चना उंदीरवाडे, पल्लवी सुनतकरी,आरती खोब्रागडे, नूतन कुंभारे, सिमा पराशर, जोत्सना राजुरकर, वर्षा हेमके, मनिशा पालकर, जोत्सना चिचघरे, मीनाक्षी सहारे, भूमिका हजारे, सुजाता ठेंगळे, नेहा बोईल, सलोनी, सुनिता तलांडे, प्रावृत्ती मांगरे, संजीवनी मांढरे, गायत्री मांढरेइत्यादीची हजेरी होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल राहुल ठवरे शहर प्रमुख यांनी केले, कार्यक्रमाचे संचानन व आभार प्रदर्शन मंगला भटलवार यांनी केले.
