जाहिरात
गडचिरोली

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक च्या अपघातात ६५ वर्षीय महिला जागीच ठार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ ऑगस्ट)

गडचिरोली शहरापासून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या चामोर्शी रोड वरील वाकडी फाट्या नजिक एका लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक क्रमांक (MH-सिटी-७८५७) ने स्कूटी चालक वृध्द दाम्पत्याला धडक दिल्याने वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला असून वृद्ध पती याला खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना आज दुपारी ३ वाजता च्या दरम्यान घडली.मृतक महिलेचा नाव कुंदा जनार्दन आखाडे असून मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्ष रा. कुनघाडा ता.चामोर्शी होते.वृद्ध आखाडे दाम्पत्य काही कामानिमित्त गडचिरोली येत होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतक महिलेचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.लोहखनिज भरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे.ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला आहे.त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button