गडचिरोली नगर परिषदेने नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांवर आकारलेली अवाजवी करवाढ तात्काळ कमी करा, प्रकाश ताकसांडे

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ सप्टेंबर)
गडचिरोली नगर परिषदेने जनतेवर लादलेली आवाजवी कर दरवाढ २०२३ पासुन ते २०२७ या कालावधी करिता आकारण्यात आलेली अधिकची व अवाजवी कर आकारणी त्वरित कमी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केलेली आहे.

नक्षलग्रस्त,आदिवासी,अतिमागास,अतिदुर्गम आकांक्षा गडचिरोली जिल्ह्यातील मुख्यालय असलेल्या नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांवर अधिकची व अवाजवी कर आकारणी आकारण्यात आलेली आहे.जागतिक महामारी COVID 19 (कोरोना) काळात गडचिरोली शहरातील नागरिकांची ढासळलेली आर्थिक व सामाजिक परिस्थिती,आरोग्य तथा कुटुंबियांवर आलेले नैसर्गिक संकट या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून यापुर्वी नगर परिषद स्थापने पासून अनेकदा वेळोवेळी गडचिरोली नगर परिषदेने शहरातील मालमत्ता धारकांवर केलेल्या मालमत्ता कर आकारणी च्या धरतीवर नियमानुसार वाजवी कर आकारणी करण्यात यावी अशी मागणी प्रकाश ताकसांडे यांनी केली आहे.
