अखेर “त्या” मुख्याध्यापक व शिक्षिका यांची तात्पुरती बदली

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि.६ मार्च)
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३ किमी. अंतरावर असलेल्या जि.प. उच्च प्राथमिक शाळा जयनगर येथे मुख्यध्यापक व शिक्षीका यांची जयनगर ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन शिक्षण विभागाने त्यांची बदली केली आहे. ते दोघे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम सोडून शाळेमध्ये गैरवर्तन करताना आढळून आल्याची तक्रार जयनगर शाळा व्यवस्थापन समिती ने पंचायत समिती चामोर्शी येथे केली होती.
पंचायत समिती स्तरावरून मुख्याध्यापकास विकासपल्ली तालुका चामोर्शी जि. गडचिरोली येथे तर विज्ञान शाखेच्या शिक्षिकेला कुनघाडा माल तालुका चामोर्शी जि. गडचिरोली येथे तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली.
ते दोघे शाळा सुटटी झाल्यावर देखील दोन दोन तास कार्यालयातच बसून राहत होते. उन्हाळी सुटटीत सुध्दा हेच दोघे काही ना काही काम दाखवून तासन तास शाळेत कुणीही नसताना कार्यालयात बंद राहायचे.या शैक्षणिक सत्रात त्या दोघांनी शाळेतच एकमेकांना मिठी मारने, जेवनाचा घास भरवणे, अनेक वेळ पर्यंत एकमेकांना चिपकून राहणे, सोबतच अत्यंत गंभीर व घृणास्पद प्रकार शाळेच्या वेळेतच करु लागले होते.
